जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा संपन्न

- Posted by Devgad College
- Posted in Sports
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने आणि देवगड कॉलेजच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा देवगड कॉलेजच्या क्रीडांगणावर पार पडली.
१७ वर्षाखालील मुलांमधून कुडाळ हायस्कूलच्या संघाने प्रथम तर कुणकेश्वर हायस्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. १७ वर्षाखालील मुलीमधून एकच संघ असल्याचे कुणकेश्वर हायस्कूलच्या संघाला विजेता घोषित करण्यात आले.
१९ वर्षाखालील मुलांमधून कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम तर देवगड महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. १९ वर्षाखालील मुलींमधून देवगड महाविद्यालयाच्या संघाने प्रथम तर शिरोडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
सर्व विजेता संघ सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.