@जागतिक महिला दिना निमित्त देवगड महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन.@

WD-rangoli

देवगड महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते .
यानिमित्त महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महारष्ट्र शासन आणि देवगड महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामने ‘ महिला सक्षमीकरणामध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका ‘ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.संजय जगताप,विभागीय सहसंचालक,उच्च शिक्षण , कोकण विभाग , पनवेल तर प्रमुख अतिथी मा. जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी या होत्या. या आभासी कार्यक्रमात डॉ.विकास बालिया,ज्येष्ठ विधी तज्ज्ञ,श्रीमती रुची जैन,संस्थापक तरू,श्रीमती नंदिनी शिंदे,API , सिंधुदुर्ग जिल्हा यांनी मार्गदर्शक म्हणून लाभले.
प्राचार्या डॉ.सुखदा जांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत केले.डॉ.विकास बालिया यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात , ‘ मुलींनी अधिकाधिक चांगले शिक्षण घेऊन आपली उन्नती साधावी.एक काळ असा होता की जेव्हा उच्च शिक्षणातील काही विभाग मुलींसाठी खुले नव्हते . आता तसे नाही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुली आहेत . महिलांकडे नैसर्गिक रीत्या , सर्वांना घेऊन पुढे जाण्याचे कौशल्य असते त्याचा त्यांनी सर्वांच्या विकासासाठी लाभ करून घेतला पाहिजे ‘ असे सांगितले. श्रीमती रुची जैन यांनी ,’ स्वतः चा शोध घ्या , तुम्हाला जे आवडते , ज्यात आनंद मिळतो ते करून पहा. देवगड मध्ये खूप चांगला निसर्ग आहे , नैसर्गिक घटकांचा वापर करून चांगली उत्पादने तयार करा आणि त्यातून आर्थिक विकास करा ‘ असे मार्गदर्शन केले.API ,नंदिनी शिंदे यांनी,’ आपला स्पर्धा परीक्षा हे मुलींसाठी चांगले क्षेत्र आहे , मुलींनी त्याकडे अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे असे सांगताना स्वतः चा अनुभव सांगितला.’ मान. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींना महाविद्यालयात येऊनही मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली.देवगड महाविद्यालयाच्या IQAC समन्वयक प्रा. डॉ.सुनेत्रा ढेरे यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सबलीकरणासाठी सुरू असलेल्या उर्मी या उपक्रमाची माहिती दिली.डॉ.संजय जगताप यांनी अध्यक्षीय भाषणात,मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध योजना आहेत , शिष्यवृत्त्या आहेत त्यांचा फायदा घेऊन चांगले शिक्षण घ्यावे आणि उत्तम भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले . WDC समन्वयक प्रा.रश्मी हिर्लेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला प्राध्यापक,विद्यार्थी आभासी स्वरूपात उपस्थित होते.
 

 

Blog Attachment

Leave us a Comment