@जागतिक महिला दिवस देवगड महाविद्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न !@

WD-aanadi

देवगड महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन डीलाईट २०२२ अंतर्गत करण्यात आले. महाविद्यालयीन महिला विकास कक्ष (CWDC) च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कर्तृत्ववान महिलाविषयक प्रश्नमंजुषा, विद्यार्थिनींसाठी क्रिकेट स्पर्धा, सर्व विद्यार्थ्यांसाठी मेहंदी आणि नेल आर्ट, वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्र – प्राचार्या डॉ.सुखदा जांबळे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. V. S. काजळे, उप प्राचार्य डॉ. T. B. माने, डॉ. L. S. सुरवसे आणि CWDC समन्वयक प्रा. रश्मी हिर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्या जांबळे यांनी कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी नृत्य , नाट्य , अभिनय अशा कलागुणाचे सादरीकरण उत्तम प्रकारे केले . तसेच वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थिनींनी सिंधुताई सपकाळ, डॉ.आनंदी जोशी, किरण बेदी, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, महाराणी सईबाई, महाराणी जोधाबाई, महाराणी पद्मावती, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई भोसले, सितारा देवी अशा भारतातील महान स्त्रियांची व्यक्तिमत्वे विद्यार्थिनींनी सादर केली.
या वेळी महाविद्यालयामध्ये कार्यरत शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रश्नमंजुषा , क्रिकेट , मेहंदी- नेल आर्ट आणि वेशभूषा स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शीतल पवार आणि विभावरी करांगुटकर या विद्यार्थिनींनी उत्तम प्रकारे पार पडले. या कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या सहयोगाने , प्राचार्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे संपन्न झाले.
  

  

  

Leave us a Comment