@देवगड कॉलेजची ‘फुगडी’ विभागातही अव्वल@

48223120_2147124691974422_5378568419291430912_n

‘लोकसत्ता लोकांकिका-2018’ च्या प्राथमिक फेरीतील उत्कृष्ट सांघिक प्रदर्शनामुळे देवगड महाविद्यालयाच्या ‘फुगडी’ या एकांकिकेने विभागातही अव्वल स्थान पटकावल्याने राज्यस्तरीय अंतिम आठ संघांत निवड झाली. ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक अशा आठ विभागांमधून अव्वल संघाची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड झाली. यामध्ये रत्नागिरी विभागातून देवगड कॉलेजने बाजी मारली.

Leave us a Comment