देवगड कॉलेजमध्ये बी. एम. एस. विभागाचा प्रतिबिंब कार्यक्रम सम्पन्न ! ! !

- Posted by Devgad College
- Posted in Programmes
देवगड कॉलेजमध्ये बी. एम. एस. विभागाचा प्रतिबिंब कार्यक्रम सम्पन्न ! ! !
रविवार दि . 9 फेब्रुवारी 2020 रोजी महाविद्यालयाच्या सभागृह मध्ये बी. एम. एस. च्या सर्व विध्यार्थ्यांसाठी प्रतिबिंब 2020 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन देवगड मधील यशस्वी उद्योजक, हॉटेल वसंत विजय चे मालक मा. श्री. राजन कोलंबकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
या प्रसंगी त्यांनी उपस्थित विध्यार्थी यांना बहुमोल मार्गदर्शन केले. महाविदयालयाचे ग्रंथपाल श्री. डी. जी . शेवाळे सर , सावित्री इंटरनेशनल स्कूल चे प्रिन्सिपल श्री. विजय ईलकर सर , प्रा. रश्मी हिर्लेकर हे ही उपस्थित होते .
यावेळी विध्यार्थी साठी लॉजिकल रीज़निंग , प्रश्नमंजुषा , हिसाब- किताब , एड – मेड शो , सर्वोत्कृष्ट विध्यार्थी – विध्यार्थीनी यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. शरद शेटे सर आणि प्रा . विजय ईलकर सर यांनी काम पहिलं.
विध्यार्थीयांना व्यवस्थापनासंबधी आपले ज्ञान , कौशल्य आणि अनुभव व्यक्त करण्याची संधी मिळाली .
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या मा. प्राचार्या डॉ . सुखदा जाम्भळे , प्रा . शरद शेटे , बी . एम . एस . विभाग प्रमुख प्रा . बाळकृष्ण तेऊरवाडकर , प्रा . सौ . तनुजा लाड यांच्या हस्ते विजेत्या विध्यार्थीयांना बक्षिसे देण्यात आली .
सर्वोत्कृष्ट विध्यार्थी म्हणून टी वाय बी एम एस च्या अनिरुद्ध बाळकृष्ण ईलकर आणि अपूर्वा अविनाश सहस्रबुद्धे यांची निवड करून पारितोषिक देण्यात आले .
यावेळी प्रथम , द्वितीय आणि त्रुतीय वर्षांतील सर्व विध्यार्थी उपस्थित होते .
या कार्यक्रमामधून व्यवस्थापन क्षेत्राचे प्रतिबिंब स्पष्ट जाणवत होते .