@देवगड कॉलेज मध्ये रंगली काव्यमैफिल@

kavya

@देवगड कॉलेज मध्ये रंगली काव्यमैफिल@

देवगड येथील श्रीम. न. शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांसाठी स्वरचित काव्यमैफील आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळावे, त्याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा साहित्यिक वारसा जपला जावा हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. या जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत जिल्ह्यातून २५ कवींनी सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या कवितांचा उपस्थित काव्य रसिकांनी मनसोक्त आनंद घेतला व नवोदित कवींना भरभरून दाद दिली. या स्पर्धेसाठी प्रथितयश कवी श्री. प्रमोद जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी सादर केलेली कवीची कथा, व्यथा आणि महती सांगणारी कविता मार्मिक ठरली. तसेच त्यांनी ‘ मालवणी पाऊस ‘ या मालवणी भाषेत सादर केलेल्या विनोदी कवितेमुळे श्रोत्यांमध्ये उत्फुर्त हास्य फुलले.

सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (कंसात क्रमांक व कविता)
राजेंद्र बोडेकर-देवगड(प्रथम : आदिमानव आता माणूस बनलाय),
दत्ताराम सावंत-सावंतवाडी(द्वितीय : अजब आमच्या महाराष्ट्राचा गजब कारभार),
घन:श्याम तांबे-मिठबाव(तृतीय : थोडे जगायचे आहे),
उत्तरा जोशी(उत्तेजनार्थ : प्रस्थान)
सर्व विजेत्यांना महाविद्यालयाकडून सन्मानपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Related Blogs

Leave us a Comment