देवगड महाविद्यातील कला शाखेचा विद्यार्थी कु. शुभम जयवंत वाडीये याला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त
- Posted by admin
- Posted in International
IIT Delhi मार्फत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “उन्नत भारत अभियान” अंतर्गत कोरोना (Co-vid 19) महामारी बद्दल जनजागृती करण्यासाठी मे २०२१ मध्ये राष्ट्रीय स्तरावर ‘Poster Making स्पर्धा’ घेण्यात आली होती, त्या स्पर्धेमध्ये भारतातून विविध विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदरील स्पर्धेमध्ये देवगड महाविद्यातील कला शाखेचा विद्यार्थी कु. शुभम जयवंत वाडीये याला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे, त्यासाठी शिक्षण विकास मंडळाचे उपअध्यक्ष श्री. चंद्रकांत पाळेकर, यांच्या हस्ते कु. शुभम जयवंत वाडीये याचा सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थेचे अध्यक्ष, सभापती, कार्यवाह व संस्था पदाधिकारी यांच्यामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या.
