देवगड महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

- Posted by Devgad College
- Posted in Institutional Welfare, Programmes
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड महाविद्यालयाच्या ‘उर्मी’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भावी उद्योजिका म्हणून कु. पूजा संजय ढोके (द्वितीय वर्ष बिझनेस मॅनेजमेंट) हिची निवड करण्यात आली. तिला भविष्यात व्यवसाय करण्यासाठी रु. पन्नास हजार पर्यंत आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण सल्लागार सलीमा कोठारे व महिला उद्योजिका सामिया चौगुले या उपस्थित होत्या.