@ देवगड महाविद्यालयात दि.23 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये संविधान सप्ताह उत्साहात साजरा @

260959728_4800463089973889_4796944600416368148_n
महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा, आणि एन. एस. एस. विभागामार्फत दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी ‘माझे संविधान -माझा अभिमान’ या उपक्रमाअंतर्गत भारतीय संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने प्रा. डॉ. पारस परमेश्वर जाधव सर यांनी भारतीय संविधाना या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
सदर कार्यक्रमास श्रीमती न. शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भिडे तर आभार प्रा. मनोहर तेली यांनी मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य कुर्लीकर सर, पर्यवेक्षिका सौ. वालावलकर मँडम व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्पर्धा -2021 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये आपल्या महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
तसेच 26 नोव्हेंबर 2021 रोजीसंविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या अनुबंध गार्डन मध्ये उभारलेल्या भारतीय संविधान उद्देशिका स्तंभाच्या ठिकाणी सदर कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय संविधानामधील प्रस्तावनेचे वाचन कु. वेदश्री बापट या विद्यार्थीनीने केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बांदेकर सर व आभार प्रा. विनोद चिंदरकर यांनी मानले.
तसेच स्पर्धा परीक्षा विभागामार्फत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहामध्ये ‘संविधान गौरव परीक्षा ‘ आयोजित करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख म्हणून प्रा. डॉ. पारस जाधव व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.
Blog Attachment

Leave us a Comment