देवगड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

272637900_5026328984053964_4203972219026208303_n
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून , देवगड मधील शिक्षण विकास मंडळ संचलित देवगड कॉलेज मध्ये ध्वजारोहण तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाला शिक्षण विकास मंडळ , देवगडचे कार्यवाह श्री.वैभव बिडये ,उपाध्यक्ष श्री . चंद्रहास मर्गज , सदस्य श्री . शैलेश महाडिक , श्री . आचरेकर , देवगड महाविद्यालयाच्या प्र – प्राचार्या डॉ.सुखदा जांबळे , अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सर्जेराव गर्जे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा . सुरेश कुर्लीकर , पर्यवेक्षिका प्रा . शुभदा वालावलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव गर्जे यांच्या शुभ हस्ते ध्वज फडकविण्यात आला . राष्ट्रगीत झाल्यावर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कु. सुधांशू सोमण आणि कु . सावनी शेवडे यांनी ‘भारत की पेहचान’ हे नव्यानेच संगीतबद्ध केलेले देशभक्तीपर गीत सादर केले . कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय , राज्य आणि जिल्हा पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या कु . राहुल सारंग ( प्रयोग सादरीकरण ) , कु . सुधांशू सोमण ( शास्त्रीय गीत गायन ) , कु . सावनी शेवडे ( शास्त्रीय गीत गायन ) , कु . सायली डामरी( निबंध स्पर्धा ) यांचे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले .
वरिष्ठ महाविद्यालयातील एनसीसी विभागातील लान्स कार्पोरल प्रतीक घाडीगावकर ( B.M.S.फायरिंग – प्रथम ) , कु . अनिश कोयंडे ( T.Y.I.T.इलेक्ट्रिक ऑऊटबोर्ड निर्मिती ) यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .
मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सव , जिल्हा स्तरावर यशस्वी ठरलेल्या कु . सानिका पाटणकर ( गायन – प्रथम ) , कु . ओम मिठबावकर ( वक्तृत्व , कथाकथन – तृतीय ) , कु . शुभम वाड्ये ( पोस्टर मेकिंग – प्रथम ) , कु . मयुरेश तारी ( ऑन द स्पॉट पेंटिंग – तृतीय ) यांचाही सत्कार करण्यात आला . शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या युवा महोत्सवात आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग , भावगीत गायन , एकपात्री अभिनय , कथाकथन आणि वक्तृत्व अशा सहा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल देवगड महाविद्यालयाला ‘ जिल्हास्तरीय ऑल राऊंडर चॅम्पियनशिप ‘ मुंबई विद्यापीठाकडून प्राप्त झाली , याबद्दल सांस्कृतिक विभागाचे प्रा. डॉ . नितीन वळंजू आणि संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात आले .
मराठी भाषा संवर्धन पंधरवडया निमित्त आयोजित , ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा – कु . मुक्ता परांजपे ,कु . दिप्ती डोलकर विभागून प्रथम , शुध्द लेखन स्पर्धा – कु . चैत्राली कोदे – प्रथम , वक्तृत्व स्पर्धा – कु . शीतल पवार – प्रथम यांचाही मराठी पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला .
महाविद्यालयातील प्रा . डॉ . भेंकी आणि प्रा . डॉ . कुनुरे यांचा डॉक्टरेट मिळवल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
NCC विभागातील कॅडेट्सनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली . कोविड – १९ चे सर्व नियम पाळून , शासकीय नियमाप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाला . बक्षीस प्राप्त विद्यार्थी,सर्व प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली .
Blog Attachment

Leave us a Comment