@ देवगड महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न @

244370661_4619262714760595_822169240770555551_n
@ देवगड महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात संपन्न @
देवगड महाविद्यालय, देवगड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शनि. 2/10/2021 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्या डॉ. जांभळे मँडम यांनी महात्मा गांधी व स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाविषयी माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. श्री. वाळके सर यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाची शपथ दिली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या आवाराची स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.कुर्लीकर सर, अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बांदेकर सर व आभार प्रदर्शन श्री. चिंदरकर सर यांनी मानले.
Blog Attachment

Leave us a Comment