@देवगड महाविद्यालयामध्ये कांदळवनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन सत्र@

247469244_4679212308765635_1148299831920045410_n
श्रीम. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड येथे भूगोल, विज्ञान व निसर्ग मंडळामार्फत गुरुवार दिनांक. 21/10/2021 रोजी कांदळवनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रा. डॉ. पारस जाधव यांनी विद्यार्थ्यांना कांदळवनाचे महत्व या विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास पर्यवेक्षिका श्रीम. वालावलकर मॅडम, प्रा. खरात सर, प्रा. मनोहर तेली, प्रा. स्वप्नील वाळके, प्रा.पाटील मॅडम, प्रा. पराडकर मॅडम उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. प्रभाकर वाघ यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. मनोहर तेली यांनी केले.
Blog Attachment

Leave us a Comment