@देवगड महाविद्यालया तर्फे ‘कायद्याची ओळख ‘ या विषयावर पथनाट्य सादर@

- Posted by admin
- Posted in Institutional Welfare, Programmes
दि.26 आँक्टोबर 2021 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व देवगड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘ आझादी का अमृत महोत्सव ‘ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. जामसंडे बाजारपेठ बसस्थानक परिसरातील उपस्थितांनी या पथनाट्यास भरभरून प्रतिसाद दिला. सदर पथनाट्यात राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी मा.श्री.पाटील साहेब,न्यायाधीश-देवगड न्यायालय, मा.श्री.बगळे-पोलीस निरीक्षक देवगड तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. रमाकांत बांदेकर, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. विनोद चिंदरकर, प्रा. सौ. मनाली गावकर व प्रा. श्री. स्वप्नील वाळके उपस्थित होते.
सदर पथनाट्यास मा.प्रा.डाँ.जांबळे मँडम, मा. उपप्राचार्य प्रा. श्री. कुर्लीकर सर, मा. पर्यवेक्षिका प्रा. सौ. वालावलकर मँडम यांचे मार्गदर्शन लाभले.