@प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे खडतर प्रशिक्षणानंतर बनल्या असोसिएट एनसीसी ऑफिसर (ANO)@

ब्रिगेडियर रणदीप सिंह डडवाल यांच्याकडून पारितोषिक स्वीकाराना प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे
महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे यांनी नुकतेच राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मध्ये खडतर समजले जाणारे असोसिएट एनसीसी ऑफिसर (ANO) साठीचे प्रशिक्षण पूर्ण केले. हे प्रशिक्षण सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी (OTA) येथे पूर्ण केले. यशस्वी प्रशिक्षणानंतर त्यांना एएनओ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी ब्रिगेडियर रणदीप सिंह डडवाल, उपकमांडंट कर्नल सिंह, लेफ्टनंट कर्नल विशाल सिंह उपस्थित होते.
देशातील निवडक १० निदेशालयातील एकूण ५१ महिला केअर टेकर या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. त्यातील महाराष्ट्रातून पाच महिला केअर टेकरचा समावेश होता. मागील वर्षी राष्ट्रीय छात्र सेनेचे ओरोस येथे मुख्यालय झाल्यापासून एएनओ प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ. ढेरे या पहिल्या महिला केअर टेकर आहेत.
प्रशिक्षणादरम्यान प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे नेतृत्व करत असलेल्या ‘ब्रेवो’ कंपनीला सर्वोत्कृष्ट संघासाठी दिला जाणारा मानाचा चैपियनशिप बॅनरचा पुरस्कार मिळाला. इतर पुरस्कारांमध्ये एनसीसी महानिदेशक ट्रॉफी दिल्ली निदेशालयची सुपर्णा जैन ठाकूर, कोर्स लीडरशिप ट्रॉफी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व चंदगड निदेशालयची वीरपाल कौर तर दीक्षांत परेड मधील सर्वोत्कृष्ट कमांडंट चे सुवर्णपदक पंजाब निदेशालयची अनिता राज यांना मिळाला.

Leave us a Comment