बौद्धिक संपदा (आय.पी.) कार्यशाळा संपन्न@जी. आय. नामांकनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन@

87378264_2933369723349911_2919144182800973824_o

@बौद्धिक संपदा (आय.पी.) कार्यशाळा संपन्न@
@जी. आय. नामांकनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन@

वैयक्तिक पातळीवर भारत खूप पुढे आहे तर एकसंघ होऊन काम करण्यामध्ये भारत अजूनही मागे आहे. विविध देशांतील आघाडीच्या कंपनींच्या प्रमुखपदी अनेक भारतीयच आहेत. हे सर्व देश पुढे नेण्यामध्ये भारतीयांचीच बुद्धिमत्ता वापरली जाते. परंतु आपल्या देशातच राहून असे काम करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे देश अपेक्षित प्रगती वेगाने करू शकला नाही. त्यासाठी सर्वांनी संघटीत होऊन, एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांनी देवगडमधील आंबा उत्पादक व शेतकऱ्यांसाठी बौद्धिक संपदा (आय.पी.) विषयी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

Leave us a Comment