@बौद्धिक संपदा (आय.पी.) कार्यशाळे अंतर्गत गावभेट@

- Posted by Devgad College
- Posted in Programmes
@बौद्धिक संपदा (आय.पी.) कार्यशाळे अंतर्गत गावभेट@
देवगड मधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांनी तालुक्यातील गावभेटी दरम्यान व्यक्त केले. बौद्धिक संपदा कार्यशाळे अंतर्गत गावागावात जीआय बद्दल असलेल्या जाणीवजागृती संबंधी माहिती घेण्यासाठी आणि तालुक्यात असलेल्या व्यवसाय संधी शोधण्यासाठी प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांनी शिरगाव व दहीबांव गावाला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी सवांद साधला.