बौद्धिक संपदा (आय.पी.) कार्यशाळा संपन्न@पेटंट मिळविण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन@

- Posted by Devgad College
- Posted in Programmes
@बौद्धिक संपदा (आय.पी.) कार्यशाळा संपन्न@
@पेटंट मिळविण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन@
भारताला पैसे देणारे नव्हे तर पैसे घेणारे राष्ट्र बनविण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत आशियातील प्रख्यात ‘जीआय मॅन’ म्हणून परिचित असलेले प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांनी देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा (आय.पी.) विषयी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. बुद्धीतून निर्माण केलेली नवीन कल्पना म्हणजे बौद्धिक संपदा होय. ही अशी कल्पना जी बुद्धीला चालना देऊन केलेली असते आणि जगात कोठेही, केव्हाही पोहोचू शकते. त्यामुळे युवकांनी या बुद्धीचा वापर करून नवनवीन पेटंट घेणे गरजेचे आहे. असे झाल्यास उत्पादने व वस्तू खरेदीमध्ये भारताला इतर देशांना पैसे मोजावे लागणार नाहीत आणि आपण ही नवीन उत्पादने विकून पैसे मिळवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. येथील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पेटंट संबधी असलेले विविध सर्टिफिकेट कोर्स महाविद्यालयात लवकरच सुरु करणार असल्याचे प्रा. अॅड. हिंगमिरे यांनी सांगितले.