मुंबई विद्यापीठ “अविष्कार” मध्ये देवगड महाविद्यालायचे यश

avishkar

मुंबई विद्यापीठ “अविष्कार” मध्ये देवगड महाविद्यालायचे यश

मुंबई विद्यापीठाच्या विभागीय अविष्कार संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उच्च यश प्राप्त केले. ही स्पर्धा कुडाळ येथील संत राऊळ महाविद्यालयात पार पडली.

यामध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या अनुजा मालंडकर व नुतन घाडीगावकर, द्वितीय वर्ष एम.एस.सी.च्या अंकुर गोरुले,जन्मेंजय भोसले,स्टॅन्ले देसा, प्रथम वर्ष एम.एस.सी. मधील रोशनी गावडे,आफिया ठाकूर,बंडू राठोड , द्वितीय वर्ष बी.एस.च्या सायली केरकर व उत्कर्ष दळवी यांनी सादर केलेल्या प्रकल्पांची मुंबई विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे.

देवगड तालुकाच्या भौगोलिक व आर्थिक विकासाशी समरस होणारे मत्स्यव्यवसाय व सौरुऊर्जेवरील संशोधनाचे प्रकल्प विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केले. विद्यार्थाच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या – तालुक्याच्या आर्थिक व सामजिक विकासाच्या धोरणाला अधिक बळ प्राप्त झाले.

 

Leave us a Comment