मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा संपन्न

- Posted by Devgad College
- Posted in Sports
मुंबई विद्यापीठ आणि देवगड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने झोन-५ मधील आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा देवगड कॉलेजच्या क्रीडांगणावर पार पडली. या स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी संघाला पराभूत करून एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी संघ विजेता ठरला. अतिशय नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करताना एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी संघाने गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी संघावर ३-० अशा गोल फरकाने मात केली.