‘रंगवैखरी-पर्व दुसरे’ मध्ये देवगड महाविद्यालयाची ‘फुगडी’ महाअंतिम फेरीसाठी पात्र

49442080_2171487316204826_6616126618152730624_n

राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या ‘नव्या वाटा’ या विषयावरील ‘रंगवैखरी-पर्व दुसरे’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीत श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचा ‘फुगडी’ हा नाट्याविष्कार महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाला २५,०००/- चे बक्षीसही मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट लेखनासाठी ऋत्वीक धुरी व राजेंद्र बोडेकर, सर्वोकृष्ट अभिनयासाठी भावना कुलकर्णी, निवेदिता वाडेकर व अथर्व तेली यांची निवड झाली.

Leave us a Comment