राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देवगड महाविद्यालय अव्वल : कॉलेजची ‘फुगडी’ रंगली

- Posted by Devgad College
- Posted in Others
‘लोकसत्ता लोकांकिका-2018’ च्या प्राथमिक फेरीत देवगड महाविद्यालयाच्या ‘फुगडी’ या एकांकिकेने अव्वल स्थान पटकावल्याने विभागस्तरावर निवड झाली. देवगड महाविद्यालयाच्या नाट्यशाखेच्यावतीने वर्षभर राबविल्या गेलेल्या विविध उपक्रमांमुळे महाविद्यालयाला हे यश मिळाले आहे. यावर्षी सुमारे 65 मुले नाट्यशाखेमध्ये काम करत आहेत. संस्थेची धोरणे व आखलेल्या योजना याला मिळालेला विद्यार्थीचा उत्स्फुर्त प्रतिसाद या सर्वांचे हे यश आहे.