राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अंकुर सोवनी प्रथम

dc

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अंकुर सोवनी प्रथम

 देवगड महाविद्यालयाचे यश.

राज्यातील तरुण  पिढीची सांगड अध्यात्म, नैतिकता आणि समाज विकास या प्रश्नांशी घालावी या उद्देशाने स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांनी आंतरराजस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा पुरस्कृत केली होती. दि.15 डिसेंबर,2017 रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय ,रत्नागिरी येथे ही स्पर्धा संपन्न झाली. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात राज्यभरातील 18 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांमध्ये , ‘नित्य घडो मज संतांची अनुभुती | जेणे होय मती सुनिर्मळ ’ या विषयावर आपल्या ओघवत्या वाणीत वक्तृत्व सदर करीत कु.अंकुर श्रीकृष्ण सोवनी (11 वी विज्ञान ब ) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याला प्रमाणपत्र व रोख रु. रक्कम 2000/- असे बक्षिस प्राप्त झाले.

देवगड कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांना हे यश प्रेरणादायी ठरेल. कु अंकुश सोवनीचे महाविद्यालायचे प्राचार्य,प्राध्यापक वर्ग,शिक्षेकेतर कर्मचारी वर्ग आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave us a Comment