@राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठी झालेल्या ‘सेट’ परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद@

College Logo
श्रीमती नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे सहायक शिक्षक म्हणून गेली 10 वर्षे कार्यरत असलेले श्री. मनोहर तेली यांनी राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठी झालेल्या ‘सेट’ परीक्षेत जीवशास्त्र या विषयात यश प्राप्त केले, तसेच सहायक शिक्षक म्हणून गेली 5 वर्ष कार्यरत असलेले श्री. प्रभाकर वाघ यांनी भूगोल या विषयातून या परीक्षेत यश प्राप्त केले.
ही परीक्षा युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेतली जाते.
सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी गोवा तसेच महाराष्ट्र मधून अनेक विद्यार्थी बसले होते.
या परीक्षेत त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून आपल्या ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याबद्दल संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य तसेच सहकारी प्राध्यापक व इतर कर्मचारी या सर्वाकडून दोघांचे अभिनंदन होत आहे.
Blog Attachment

Leave us a Comment