वेध २०१७ – समृद्ध मनांची कार्यशाळा

dc

समृद्ध मनांची कार्यशाळा

महाविद्यालयीन शिक्षण घेणारा आपला विद्यार्थी सामजिक व व्यक्तिगत समस्यांना निर्भिडपणे सामोरा जावा व त्यासाठी प्रथम त्यांचा मार्गदर्शक असणारा शिक्षक हा मुख्य घटक प्रशिक्षित असावा असे तज्ञ समितीचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरूनच महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांनी मुंबई येथे संपन्न झालेल्या  ‘माईंड फेस्ट ’ या प्रशिक्षण वर्गात सक्रीय सहभाग घेतला.

डॉ.आनंद नाडकर्णी संचलित, ईन्सिट्युट  फॉर सायकॅालॉजीकल हेल्थ या संस्थेच्या वतीने, दिनांक 09 व 10 डिसेंबर असे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात महाविद्यालाच्या वतीने पाच शिक्षकांनी प्रशिक्षण घेतेले.

या कार्यक्रमामध्ये आसाम मधील पद्मश्री पुरस्कार प्राप्त जादव पायेंग,ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ,भरत केळकर, खादी आणि स्वाभिमान हे तत्व जगणारे डॉ.उल्हास जाजू, अरुण ठाकूर, नलिनी नावरेकर , छत्तीसगड मधील शामदास बेगम, ‘फास्टर फेणे ’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सापोतदार,लेखक – क्षितीज पटवर्धन, व्हायोलिनचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने देणाऱ्या रमा चोभे, अॅसिड हल्ल्याने चेहरा विद्रूप झालेल्या तरुणींसाठी कार्य करणाऱ्या दिल्ली मधील लक्ष्मी सा, पत्रकार आलोक दीक्षित, संस्कृतचे अभ्यासक व भगवदगीता कुराण मधील साम्य दर्शवणारे दिल्ली मधील डॉ.मोह्म्मद हनीफ खान शास्त्री काश्मिरमधील मुलांसाठी शाळा सुरु करणारे, तेथील तरुणतरुणींना रोजगाराची संधी मिळवून देणारे सारंग गोसावी निरस आयुष्यात हास्याची साखर पेरणी करणारा अभिनेता संदीप पाठक अशा अवलियांची मैफिल जमली होती.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून झाडे लावून त्यांचे संगोपन करणारे आसाम मधील जादव पायेंग यांनी प्रकृतीचे महत्त्व अधोरेखित केले.भौतिक विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी निसर्गापुढे सारेच न्यून आहे असे त्यांनी सांगितले. खास आसामी वेशभूषेतून त्यांचे वेगळेपण दिसून आले.युद्धाच्या कथा वाचायला , ऐकायला रम्य वाटत असल्या तरी  त्याचे परिणाम भयानक असतात.सिरीया सारख्या युद्धभूमीवर नावून तेथील युद्धामध्ये जखमी झालेल्यांना वैदकीय सुविधा पुरविणाऱ्या डॉ.भारत केळकर यांनी ‘आपल्या चौकटीबाहेर जावून विचार केला पाहिजे असे सांगितले.’खादीचा धागा’ या सत्रामध्ये नलिनीताईंनी प्रत्यक्ष चरख्यावर सूत कताई करून दाखविली.इंग्रजांच्या राजकारणामुळे भारताची झालेली पीछेहाट, खादीचे महत्त्व या मुद्यावर चर्चा झाली. महिला या जसा चांगला स्वयंपाक करू शकतात तशाच समाजाला शिस्तही लावू शकतात.’लाठी ब्रिगेड’ ,मधून अनेक महिलांना कार्यप्रेरित करणाऱ्या शमसाद बेगम यांच्या कामाची उंची कळाली. आजच्या तरुणांची स्पंदने आदित्य सापोतदार व क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या चित्रपटाचे दाखले देवून सांगितली.

व्हायोलीन सारख्या लहान व वाजवायला अत्यंत कठीण अशा वाद्या सोबतचा आपला 14 वर्षाचा प्रवास पुणे येथील रमा चोभे व सहकाऱ्यांनी उलगडला.मुलांच्या जडणघडणीमधील पालकांचा वाटा त्यांनी स्पष्ट  केला.सौंदर्याची व्याख्या अधिक स्पष्टपणे पत्रकार आलोक दीक्षित.रिचा यांनी सांगितली.Shero’s  कॅफेची निर्मिती व गरज : संकल्पना श्री दीक्षित  यांनी सांगितली.

‘माझा धर्म श्रेष्ठ कि तुझा ’ अस म्हणून भांडण्यापेक्षा , भेद पाहण्यापेक्षा साम्य पहा असे डॉ.मोहम्मद खान शास्त्री यांनी सांगितले.’आत्मभान ते देशमान ’ या सत्रात काश्मिर मधील तरुणांसाठी काम करणाऱ्या सारंग गोसावी यांनी ‘असीम ’ संस्थेची जडणघडण उलगडली.शेवटी अभिनेता संदीप पाठक याच्या विनोदी सादरी कारणाने ‘शेवट गोड ’ केला.डॉ. आनंद  नाडकर्णी यांचे निवेदन,व्हिडीओ क्लिप यांमुळे कार्यक्रम रंगददार झाला.

समृद्ध मन,समृद्ध विचार करत,समृद्ध विचार समृद्ध कृती करतात, समृद्ध कृतीतून महान कार्य घडतात.आज तरुणांना असे आदर्श मिळाले पाहिजे. त्यांच्यामधील प्रचंड उर्जेला योग्य दिशा मिळाली तर ही तरुणाई आपली शक्ती बनेल.देवगड कॉलेज मधील विद्यार्थ्यानामोर असे आदर्श उभे करणे हेच संस्थेचे धेय्य आहे.सामन्यातून असामन्य कर्तृत्व निर्माण करण्याची जिद्द,संकटासमोर न हरता त्यांचा सामना करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. हेच शिक्षकांचे कार्य आहे.यालाच अधोरेखित करणारा हा कार्यक्रम होता.असा उपक्रम भविष्यामध्ये देवगड कॉलेज मध्ये राबविण्याचे कॉलेज प्रशासनाने निश्चित केले.आहे.

 

Leave us a Comment