श्री. सत्यवान रेडकर, यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान

दि. २० सप्टेंबर २०२१ रोजी श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड याठिकाणी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागार्फात श्री. सत्यवान रेडकर, (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क विभाग, भारत सरकार) यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान पार पाडण्यात आले. सदरील व्याख्यानामध्ये श्री. रेडकर यांनी शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी असणार्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, आवश्यक शैक्षणिक अहर्ता, अभ्यासक्रम, इतर तांत्रिक बाबींबद्दल मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ. सौ. सुखदा जांबळे यांच्या हस्ते श्री. सत्यवान रेडकर सरांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. सुरेश कुर्लीकर, पर्यवेक्षिका सौ. शुभदा वालावलकर, तसेच प्रा. शरद शेटे, प्रा. मनोहर तेली, प्रा. रश्मी हिर्लेकर व आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप तेली यांनी केले तसेच प्रा. डॉ. नितीन वळंजू यांनी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले.
Blog Attachment

Leave us a Comment