@श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षा मार्फत विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन @

WhatsApp Image 2022-03-07 at 21.51.14

श्री. स. ह. केळकर महाविद्यालय आणि महिला विकास कक्ष आयोजित विविध कार्यक्रम पैकी एक कार्यक्रम म्हणजे स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले आयोजन होय. आज दिनांक ७ मार्च रोजी ठिक ९ वाजता ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वात प्रथम स्वसंरक्षण प्रशिक्षक श्रीमती शेवंता नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा म.  जांबळे यांच्या कार्यक्रमसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या समन्वयक  प्रा. रश्मी हिर्लेकर यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्व आणि कार्यक्रमाचा उद्देश यावर प्रकाश टाकला. . या कार्यक्रमाला अनुसरून प्रशिक्षक शेवंता नाईक यांनी कराटे मधील विविध क्लुप्त्या आणि पैलुंची माहिती दिली. ह्या प्रशिक्षणात महाविद्यालयातील त्रेपन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आभार प्रदर्शनाने ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.

Blog Attachment

Leave us a Comment