@सन्मान आशा ताईंचा@

सन्मानपत्रासहित आशा स्वयंसेविका
शिक्षण विकास मंडळ, देवगड व देवगड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील १२० आशा स्वयंसेविकांना सन्मानित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. केंद्र व राज्य सरकार राबवित असलेल्या विविध सुमारे ७२ योजना खेडोपाड्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व आशा स्वयंसेविका करतात. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आशा स्वयंसेविकांनी अतुलनीय समाजसेवाकार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेने व महाविद्यालयाने देवगड तालुक्यातील आशा स्वयंसेविकांचा आर्थिक मदत व सन्मानपत्र देऊन सत्कार केला.

Leave us a Comment