1992 च्या बारावीच्या बॅचची बैठक व चर्चा

- Posted by Devgad College
- Posted in Others
1992 च्या बारावीच्या बॅचची बैठक व चर्चा
1992 च्या बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी, गेल्या वर्षीच्या संस्थेच्या धोरणानुसार आतापर्यंत जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले त्यांचा गेल्या 20-25 वर्षातील अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून, येथील परिस्थिती मध्ये त्याचा उपयोग कसा करता येईल व देवगड मधील पालकांचा कल लक्षात घेऊन त्यांचा अनुभव सांगून पुढील वाटचाल कशी करावी याविषयी काही मार्गदर्शक सुचना देण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन चर्चा केली. यामध्ये मनुष्यबळ विकास, आरोग्यसेवा, सामाजिक, मच्छिमार, सैन्यदल, गृहिणी इत्यादी विविध क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अकरावी पासूनचा अभ्यासक्रम कसा परिपूर्ण होईल याविषयी मार्गदर्शक सुचना संस्थेला देण्यासाठी चर्चा केली. हे असेच काम प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून त्याची माहिती वेळोवेळी संस्थेकडून देण्यात येईल.