देवगड महाविद्यालयात ४ उपप्राचार्यांची नियुक्ती

2

देवगड महाविद्यालयात ४ उपप्राचार्यांची नियुक्ती

देवगड महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय आराखड्यानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. टी परुळेकर यांनी देवगड महाविद्यालयात ४ उपप्राचार्यांची नियुक्ती केली. यामध्येप्रशासन– डॉ. एस. एम. जांभळे, पायाभूत सोयीसुविधा – डॉ. एल. एस. सुरवसे, संशोधन आणि विकास – डॉ. टी. बी. माने व कनिष्ठ महाविद्यालय – प्रा. बी. एस. पोवार यांची नियुक्ती करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रशासकीय कार्यभार याअगोदरच प्रा. पी. बी. सकटे यांच्याकडे पर्यवेक्षक म्हणून सोपविण्यात आलेला आहे व त्यांनी त्यांचे काम महाविद्यालयाच्या धोरणांनुसार यापूर्वीच सुरु केलेले आहे. देवगड महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण पद्धतीकडे वाटचाल सुरु झालेली आहे आणि यासाठी कार्याची समान विभागणी करून प्रत्येकाच्या कार्यकुशलतेचा उपयोग करून घेऊन सुरु झालेली ही वाटचाल अधिक जलद गतीने साधण्याचा महाविद्यालयाचा निर्धार आहे आणि यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचे मत प्राचार्य डॉ. जी. टी परुळेकर यांनी उपप्राचार्यांच्या पहिल्या सभेत मांडले. देशाच्या शैक्षणिक धोरणानुसार संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्याचा निर्धार त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

Related Blogs

Leave us a Comment