प्राध्यापक डॉ. एल. एस. सुरवसे यांच्या शोधनिबंधाची अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

देवगड महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एल. एस. सुरवसे यांच्या शोधनिबंधाची अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

स्वतः परिषदेला उपस्थित राहून करणार शोधनिबंधाचे सादरीकरण

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मंजूर

देवगड महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एल. एस. सुरवसे यांच्या शोधनिबंधाची अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानही मंजूर झाले आहे. डॉ. सुरवसे हे अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला स्वत: उपस्थित राहून सदर शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत. देवगड महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण पद्धतीकडे नेण्यासाठी अलीकडे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत आणि महाविद्यालय त्या दिशेने मार्गस्थ होतानाही दिसत आहे. याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण पद्धतीकडे चाललेली वाटचाल म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे.

डॉ. सुरवसे यांनी Nanomaterials & Nanotechnology  या विषयांतर्गत शोधनिबंध तयार केला असून सदर शोधनिबंध अमेरिकेतील VBRI PressAB च्या वतीने आयोजित American Advanced Material Congress या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवडण्यात आला आहे. सदर आंतरराष्ट्रीय परिषद ही अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी या ठिकाणी Royal Carebian Cruise वर दि. ०४ डिसेंबर, २०१६ ते ०९ डिसेंबर, २०१६ या कालावधीत संपन्न होणार आहे. डॉ. सुरवसे यांनी केलेल्या संशोधनाच्या सहाय्याने तयार केलेल्या मटेरिअल्सचा उपयोग विविध प्रकारच्या यंत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये केल्यास ही यंत्रे कमी तापमानामध्ये सुद्धा प्रभावीपणे कार्य करू शकतात. विशेषकरून सॅटेलाईटच्या सौर पॅनेलमध्ये, मिलिटरीच्या संरक्षण यंत्रणेच्या सूक्ष्म निरीक्षणासाठी या संशोधनाचा वापर करता येऊ शकतो. तसेच काळोखामधील इमेज पकडण्यासाठी सुध्दा या मटेरिअल्सचा उपयोग केला जाऊ शकतो. डॉ. सुरवसे यांच्या या शोधनिबंधाच्या निवडीबद्दल त्यांचे सगळीकडून विशेष अभिनंदन होत आहे.

Related Blogs

Leave us a Comment