अविष्कार महोत्सव- मुंबई विद्यापीठाचा संशोधन उपक्रम

avishkar

देवगड महाविद्यालयात साकारला अविष्कार महोत्सव मुंबई विद्यापीठाचा संशोधन उपक्रम

देवगड महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाचा अविष्कार महोत्सव संपन्न झाला. ‘युनिव्हर्सिटी रिसर्च कन्व्हेक्शन – अविष्कार’ असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या वतीने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवताना त्यांनी तयार केलेल्या विज्ञान संशोधन प्रकल्पांचे पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शन व सादरीकरण केले.

शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधनाचे महत्व अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधन अभिवृत्ती वाढीस लावून त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना देण्याचा प्रयत्न अलीकडे विभिन्न प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून केला जात आहे. अशाच प्रकारचा मुंबई विद्यापीठाचा हा उपक्रम अविष्कार या नावाने ओळखला जातो. प्रस्तुत वर्षी देवगड महाविद्यालयाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत मुंबई विद्यापीठाने युवा महोत्सव, अविष्कार व उडान या मुबई विद्यापीठाच्या तिन्ही सर्वोत्तम कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी देवगड महाविद्यालयाकडे दिलेली आहे.

सदर महोत्सवामध्ये पदवीधर गटात कला शाखेतून देवगड कॉलेज, कणकवली कॉलेज, वैभववाडी कॉलेजच्या प्रत्येकी एका प्रकल्पाची, वाणिज्य शाखेतून देवगड कॉलेजचे दोन, विज्ञान व अॅग्रीकल्चर मधून वैभववाडी कॉलेजच्या प्रत्येकी एका प्रकल्पाची निवड विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. तर पदव्युत्तर गटात वाणिज्य व विज्ञान शाखेतून देवगड कॉलेजच्या प्रत्येकी एका प्रकल्पाची निवड विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

सदर उपक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे वरिष्ठ अभियंता नामदेव चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे अविष्कार समन्वयक डॉ. आर. सी. पाटील, अविष्कारचे जिल्हा समन्वयक व विविध महाविद्यालयांतील नामवंत प्राध्यापक परीक्षक म्हणून उपस्थित होते.

Leave us a Comment