देवगड महाविद्यालयात ६३ व्या सहकार सप्ताह

63

देवगड महाविद्यालयात ६३ व्या सहकार सप्ताहानिमित्त उपक्रम

 सहकार विषयासंदर्भात व्याख्यानमालेचे आयोजन

शासनाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय सहकारी संघामार्फत दि. १४ नोव्हेंबर, २०१६ ते २० नोव्हेंबर, २०१६ या कालावधीत ६३ व्या सहकार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सहकार सप्ताहाच्या निमित्ताने राज्याची सहकारी चळवळ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आयोजित केले जात आहेत. देवगड महाविद्यालयात शिक्षण विकास मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था व शिक्षण विकास मंडळ विद्यार्थी ग्राहक सहकारी संस्था कार्यरत आहेत. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये सहकाराची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न देवगड महाविद्यालय करत आहे. याच सहकारी चळवळीची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी शासनाच्या सहकार सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सहकार विषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानमालेअंतर्गत प्रा. एस. व्ही. शिरसाठे यांनी सहकाराची एकंदरीत गरज, प्रा. पी. एन. कांबळे यांनी सहकाराचा उदय व संकल्पना, प्रा. बी. व्ही. रॉड्रिग्ज यांनी सहकारी संस्थांची विद्यमान स्थिती, प्रा. डी. व्ही. पन्हाळकर यांनी सहकाराचे विद्यार्थ्यांसाठीचे महत्व व डॉ. एल. बी आचरेकर यांनी स्थानिक पातळीवरील सहकारी संस्था व त्यामधील विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वृद्धिंगत होऊन त्याद्वारे त्यांनी भावी आयुष्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहावे हा महत्वपूर्ण उद्देश आहे.

Related Blogs

Leave us a Comment