देवगड महाविद्यालयात साकारला पदवी प्रदान सोहळा

devgad college convocation

देवगड महाविद्यालयात साकारला पदवी प्रदान सोहळा

कोल्हापूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक श्री. एम. के. गोंधळी यांची प्रमुख उपस्थिती  

देवगड महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०१५-२०१६ मधील पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा देवगड महाविद्यालयात साकार झाला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून कोल्हापूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक श्री. एम. के. गोंधळी हे उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. एम. के. गोंधळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. श्री. एम. के. गोंधळी हे स्वत: आकाशवाणी, दूरदर्शन तसेच, लंडन येथे पपेट अँड कॉमेडी शो सादर करणारे कलावंत असल्यामुळे त्यांनी पारंपारिक गाणी, बहिणाबाईंची गाणी, आकाशवाणीवर यापूर्वी त्यांनी स्वत: सादर केलेले प्रहसन देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सादर केले. त्यांना स्वत:ला निवेदन, सूत्रसंचालन, कथाकथन, काव्यवाचन, एकपात्री अभिनय, बाहुलीनाट्य, मिमिक्री इत्यादी कलागुणांची आवड असल्यामुळे आवाजावरील पकड, व्यक्तिमत्व विकास याविषयीचे मार्गदर्शनही त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले.

यावेळी प्रमुख अतिथी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुदेव परूळेकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०१५-२०१६ मधील देवगड महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी शैक्षणिक वर्ष २०१५-२०१६ बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave us a Comment