देवगड महाविद्यालयात ‘द ऑक्सफर्ड कनेक्शन’

mu oxford in devgad

देवगड महाविद्यालयात द ऑक्सफर्ड कनेक्शन..

देवगड महाविद्यालयाने मागील शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसे शिक्षण देता येईल याचाच प्रामुख्याने विचार केला आहे. याच उपक्रमांतर्गत देवगड महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. मागील शैक्षणिक वर्षी ‘द ऑक्सफर्ड कनेक्शन’ या उपक्रमांतर्गत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी देवगड महाविद्यालयात येऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने अध्यापन केले होते. त्याला विद्यार्थ्यांचा, प्राध्यापकांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता. सदर उपक्रमाला मिळालेली प्रचंड यशस्विता पाहून प्रत्येक वर्षी सदर उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याच उपक्रमांतर्गत प्रस्तुत वर्षी ‘द ऑक्सफर्ड कनेक्शन’ हा उपक्रम देवगड महाविद्यालयात यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.

यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अनेक तज्ज्ञ माजी विद्यार्थी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी महाविद्यालयात उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने व्याख्याने, कार्यशाळा, विद्यार्थ्यांशी संवाद व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. मैथिली जामसंडेकर यांनी उद्योजकतेमध्ये स्त्रियांना संधी, तसेच सशस्त्र दलासाठी आवश्यक शारीरिक क्षमता व आत्मविश्वास वाढविण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय आर्मी ट्रेनिंग व पोलिस भरती साठीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले. डॉ. विकास बालिया यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम व संशोधन, तसेच कायदा क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रुचि जैन यांनी फळ प्रक्रिया उद्योग व विपणन व्यवस्थेमधील करिअरच्या संधी याविषयीची कार्यशाळा घेतली. जे. मधुसूदन गौडा यांनी नवीन आस्थापना व कंपनीचे प्रकार व गुंतवणूक क्षेत्राविषयी माहिती दिली. आलोक भूषण यांनी नवीन व्यवसायाची सुरुवात व व्यवसाय परिवर्तन याविषयी व्याख्यान घेतले. गौतम मंडियन यांनी अर्थशास्त्र व पतपुरवठा यामधील करिअरच्या संधी व स्थूल अर्थशास्त्र याविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन प्राध्यापक वर्गासाठीही नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीविषयी कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी उपरोक्त तज्ज्ञांसोबत डॉ. आनंद बारिया व सुहाग शिरोडकर या तज्ज्ञांनी आपला सहभाग नोंदविला.

Related Blogs

Leave us a Comment