एन. सी. सी. विद्यार्थ्यांचा दिल्ली येथील संचलनात सहभाग

devgad college ncc represent in dehli parade

देवगड महाविद्यालयातील दोन एन. सी. सी. विद्यार्थ्यांचा ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील संचलनात सहभाग

आतिष जयवंत चव्हाण व विरेंद्र सिताराम कुमठेकर या दोन विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

देवगड महाविद्यालयात एस. वाय. बी. कॉम. वर्गात शिकत असणार्‍या आतिष जयवंत चव्हाण व विरेंद्र सिताराम कुमठेकर या दोन एन. सी. सी. विद्यार्थ्यांनी ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या संचलनात सहभाग घेतला.

सदर दोन्ही विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे होणार्‍या परेडपूर्वी एन. सी. सी. च्या अनेक कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. अशा कॅम्पमधून विद्यार्थ्यांच्या मूलभूत, कला, क्रीडा, संचलन, शिस्त अशा गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा अनेक प्रकारच्या खडतर प्रशिक्षणानंतरच महाराष्ट्रातून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड दिल्ली येथे होणार्‍या संचलनासाठी केली जाते. सदर वर्षी झालेल्या संचलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती. त्यामध्ये देवगड महाविद्यालयाच्या या दोन विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

प्रस्तुत शैक्षणिक वर्षी देवगड महाविद्यालयाने जे नवीन शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, तसेच क्रीडाविषयक धोरण राबविण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच प्रयत्नांची यशस्विता आज आपल्याला अशा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहावयास मिळत असल्याचे मत यानिमित्ताने देवगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. टी. परुळेकर यांनी व्यक्त केले.

Related Blogs

Leave us a Comment