देवगड महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९८.६३%

result of devgad college

देवगड महाविद्यालयाने सुरू केलेल्या गुणवत्ता वाढ योजनेला प्रचंड यश

देवगड महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९८.६३%

 

प्रस्तुत शैक्षणिक वर्षी देवगड महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने गेल्या पाच वर्षाच्या निकालाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीची योजना मांडली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाची पद्धती वापरताना सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या गुणवत्तेनुसार अ, ब, क आणि ड गटात वर्गीकरण करण्यात आले. सदर योजनेचे संयोजक म्हणून डॉ. लवू आचरेकर व प्रा. दत्तात्रय येंडे यांची नियुक्ती करण्यात आली. उत्कृष्ट नियोजन, वेळ व योग्य समन्वय यांवर भर देण्यात आला. सदर वर्गीकरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांचे विशिष्ट गट पाडून त्या गटाची जबाबदारी एका प्राध्यापकाकडे देण्यात आली. सदर प्राध्यापकांनी त्या गटातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. त्या – त्या गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा व मानसिकता लक्षात घेऊन त्यानुसार आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. पालकांशी फोनद्वारे संपर्क व त्यांच्या घरी जाऊन पालकांची भेट घेऊन पाल्याच्या प्रगतीचा आढावा पालकांना देऊन पाल्याच्या सुधारणेसाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना पालकांना करण्यात आल्या. या योजनेला अनुसरून पालकांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. महाविद्यालयाच्या सदर योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व गुणवता वाढीसाठी निश्चित मदत झाली व त्याचा परिणाम म्हणजे देवगड महाविद्यालयाचा आजचा लागलेला हा ९८.६३% निकाल. यासाठी सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुदेव परुळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व ही योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Related Blogs

Leave us a Comment