सेंद्रिय शेती स्पर्धा

Event Description

देवगड महाविद्यालय,
देवगड जि. सिंधुदुर्ग, आयोजित
” सेंद्रिय शेती स्पर्धा ”
जागतिक महामारी Covid-19 ने जगासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. परंतु सद्यस्थितीचा संधी म्हणून उपयोग करून घेणे हेच क्रमप्राप्त आहे. दैनंदिन आयुष्यात रसायनांचा अतिरेकी वापर आणि निसर्गाचा ढळणारा समतोल यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. याबद्दल जागरूकता निर्माण होत असून सेंद्रिय शेती उत्पादनांना सध्या मोठी मागणी आहे. शहरांच्या ठिकाणी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावणारे देवगडचे अनेक रहिवासी आज गावामध्येच नवीन संधीच्या शोधात आहेत. कुटुंबापासून दूर, काटकसरीचे, धकाधकीचे आणि अशाश्वत जीवन शहरामध्ये जगण्यापेक्षा ‘गड्या अपुला गाव बरा’ या उक्तीला अनुसरून स्वतःच्या गावातच शेती सुरू करण्याचा विचार युवकांनी केला पाहिजे. यातूनच स्वतःसाठी उत्पन्न आणि इतरांसाठी रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकेल. देवगडच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीकरिता नवीन संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित व्हावीत म्हणून देवगड महाविद्यालय सेंद्रिय शेती स्पर्धा आयोजित करत आहे.
https://forms.gle/vgzDE1GzX8WGxuyX7
सेंद्रिय शेती स्पर्धा २०२०
*नियम व अटी:
१. सदर स्पर्धेत फक्त देवगड महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ (शैक्षणिक वर्ष २०१९-२०२०) विभागात सध्या शिकत असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी भाग घेवू शकतील.
२. सदर स्पर्धेत फक्त देवगड तालुक्यात राहणारे विद्यार्थ्यी किंवा विद्यार्थिनी भाग घेवू शकतील.
२. सहभागी विद्यार्थ्यी किंवा विद्यार्थिनीने १ गुंठे जमिनीमध्ये पावसाळ्यात आपल्या भागात येणाऱ्या पिकांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घ्यायचे आहे.
३. शेतीसाठी वापरण्यात येणारी जमीन हि आपल्या घराजवळील किंवा परस बागेतील असली तरी चालेल.
४. सदर शेती हि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीची असली पाहिजे.
५. शेतीसाठी वापरण्यात येणारी बी-बियाणी हि संकरित नसावीत.
६. शेतीच्या कुंपणासाठी प्लास्टिकचा वापर करू नये.
७. आपण केलेल्या शेतीची पाहणी सप्टेंबर महिन्यामध्ये करण्यात येईल.
८. तज्ञांच्या अहवालानुसार स्पर्धेचा निकाल घोषित करुन विजेत्यास रोख रु. १०,०००/- बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाईल.
९. सदर स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस प्रमाणपत्र दिले जाईल.
१०. सेंद्रिय शेती स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा.
* अधिक माहितीसाठी संपर्क –
१. प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे – ७३८५४१०४८२
२. प्रा. डॉ. नितीन वळंजू – ९४०४९१३५५४, ९११२४५३०१२
३. प्रा. संदीप तेली – ९४२२९१९२३३
४. प्रा. अमोल येंडे – ९४०३०४११००

डॉ. सुखदा जांबळे
प्र. प्राचार्य

Built Process