Chess Competition in Devgad College

Event Description

देवगड महाविद्यालयाच्या नवीन क्रीडा धोरणाची यशस्विता

महाविद्यालयात खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

देवगड महाविद्यालयाने या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स पॉलिसी तयार केली असून त्याअंतर्गत महाविद्यालयातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळांमध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळांमध्ये सहभागी होता यावे व खेळामध्ये आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना खेळासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा त्यामागील महत्वपूर्ण उद्देश आहे. त्यासाठी फूटबॉलसारखा खेळही यावर्षी सुरू करून त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. त्याचप्रमाणे अन्य खेळांसाठीही चांगले वातावरण व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे.

देवगड महाविद्यालयाच्या याच प्रयत्नांची परिणीती म्हणजे रविवार दि. ०४ डिसेंबर,२०१६ रोजी देवगड महाविद्यालयात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ही फिडेच्या नियमांनुसार खेळविली गेली तसेच या स्पर्धेत १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व खुल्या वयोगटासाठी अशी ३ गटांत सदर स्पर्धा खेळविण्यात आली.  सदर स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे बक्षिसे देण्यात आली.

१४ वर्षाखालील वयोगट – प्रथम क्रमांक–१०००/- द्वितीय क्रमांक–७००/- तृतीय क्रमांक–५००/-

१७ वर्षाखालील वयोगट – प्रथम क्रमांक–१५००/- द्वितीय क्रमांक–१०००/- तृतीय क्रमांक–७००/-

खुला वयोगट – प्रथम क्रमांक–३०००/- द्वितीय क्रमांक–२५००/- तृतीय क्रमांक–२०००/-  चतुर्थ क्रमांक-१५००/- पंचम क्रमांक-१०००/- व पुढील ६ ते १० क्रमांकांसाठी ५००/-

 

05:00Pm / Welcome to Guest

Pangolin regarding rabbit ahead dolorously soothingly ouch unbound excluding sewed and hedgehog unsuccessfully struck labrador besides and yet by goodness much bowed meadowlark.