इराणमधील सायकलचा प्रवास – मा. फिरोज पालखीवाला

  • image
  • image
  • image
  • image

राष्ट्र सुधारायचे असेल तर तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. विद्यार्थी, विद्यार्थी आणि विद्यार्थी..! – मा. फिरोज पालखीवाला /

इराणमधील सायकलचा प्रवास मा. फिरोज पालखीवाला

पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, शिक्षणप्रेमी, स्पोर्ट्समन म्हणून प्रसिद्ध असणारे मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील मा. फिरोज पालखीवाला यांनी देवगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी, प्राध्यापकांशी व संस्थेशी सुसंवाद साधला.

शिक्षण विकास मंडळ देवगडच्या तज्ञ समितीने शिक्षण, कायदा, अभियांत्रिकी, वैद्यक सिनेक्षेत्र अशा विविध क्षेत्रातील देश – विदेशात उत्कृष्ट कार्य केलेल्या तज्ञांना बोलावून विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रेरणादायी दृष्टी देण्याचा संकल्प केला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील मा. फिरोज पालखीवाला यांनी देवगड कॉलेजला भेट देऊन या सर्वांशी सुसंवाद साधला.

यावेळी विद्यार्थ्यांशी इराण मधील सायकलचा प्रवास या विषयावर सुसंवाद साधताना त्यांनी इराण मध्ये २००० किमी सायकलचा प्रवास करताना आलेले थक्क करणारे अनुभव विद्यार्थ्यां समोर मांडले. ते म्हणाले की, राष्ट्र सुधारायचं असेल तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे विद्यार्थी, विद्यार्थी आणि विद्यार्थी. कारण तरुण रक्त काय करतं यावर राष्ट्राचं भवितव्य अवलंबून असतं. याशिवाय प्राध्यापकांशी प्रेरणादायी अध्यापन या विषयावर संवाद साधताना प्राध्यापक एकजूटीने व प्रसन्न वातावरणात करत असलेल्या कार्याचे कौतुक करून ऑक्सफर्ड व हॉवर्ड विद्यापीठांच्या प्रगतीचा दाखला देत कर्तव्यदक्षतेचा आवर्जून उल्लेख केला. प्रगत राष्ट्रांमधील संस्थाचालक मला काय मिळाले यापेक्षा मी काय देऊ शकलो याचा अधिक विचार करतात आणि म्हणूनच विदेशातील शिक्षण पद्धती अधिक प्रगल्भ असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विकास मंडळ देवगडचीही वाटचाल त्या दिशेने सुरू झाली असून लवकरच ही संस्था देश – विदेशाच्या पटलावर झळकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दनशेठ तेली, सभापती श्रीम. तृप्ती पारकर, कार्यवाह श्री. प्रसाद पारकर, संस्थेचे अन्य पदाधिकारी व नियामक समिती सदस्य यांची संस्था ऑफिस मध्ये भेट घेतली.

Related Blogs

Leave us a Comment