देवगड महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल लीग संपन्न

football league in devgad college

देवगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला

देवगड फुटबॉल लीगचा (DFL 2017) थरार

देवगड महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल लीग संपन्न

देवगड महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून नवीन क्रीडा धोरण तयार करून देवगड महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळांमध्ये आवड व विशेष प्राविण्य मिळविता यावे यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत व त्याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देवगड महाविद्यालयातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी व या जगामधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने देवगड महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आंतरमहाविद्यालयीन देवगड फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले होते.

प्रस्तुत वर्षी ऑक्टोबर महिन्यात सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन संपन्न होत आहे व त्याचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळालेली आहे. त्या धर्तीवर भारतामध्ये फुटबॉल खेळ लोकप्रिय करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये सदर खेळाची आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सदर खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने देवगड महाविद्यालयाने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची फुटबॉल लीग आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सदर स्पर्धेसाठी एस. आर. एम. कॉलेज कुडाळ, एम. आय. टी. एम. कॉलेज ओरोस, एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी, सैनिक स्कूल आंबोली, स. ह. केळकर महाविद्यालय देवगड व एन. एस. पंतवालावलकर महाविद्यालय देवगड अशा एकूण सहा संघांनी आपला सहभाग नोंदविला.

सदर स्पर्धेमध्ये सैनिक स्कूल आंबोली संघाने प्रथम क्रमांकाचे रु. ५०००/- चे व एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी संघाने द्वितीय क्रमांकाचे रु. ३०००/- चे पारितोषिक पटकावले. तर सैनिक स्कूल आंबोली च्या गौरव घाटये या खेळाडूने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान मिळविला. यापुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फुटबॉल खेळ लोकप्रिय करण्यासाठी देवगड महाविद्यालयाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील व जगातील हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ भारतामध्येही लवकरच लोकप्रिय होईल असा विश्वास देवगड महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केला.

Related Blogs

Leave us a Comment