देवगड महाविद्यालयात औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

industrial training in devgad college

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवगड महाविद्यालयाचा उपक्रम औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

देवगड महाविद्यालयाने सन २०१६-१७ च्या प्रथम सत्रात अनेक विद्यार्थीकेंद्रित व समाजकेंद्रित उपक्रम राबविले आहेत. यापैकीच एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन नोकरीची तरतूद व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाने डोंबिवली येथील तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड या आय. टी. कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. कारण विद्यार्थ्यांना केवळ पदवी शिक्षण देऊन चालणार नाही, तर भविष्यातील त्यांच्या नोकरीची तरतूदही करणे तितकेच महत्वाचे आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे यापुढे महाविद्यालयाचे महत्वपूर्ण ध्येय असेल. याला अनुसरूनच महाविद्यालयाने हा सामंजस्य करार केला आहे.

याच कराराअंतर्गत सदर डोंबिवली येथील तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने देवगड महाविद्यालयातील तृतीय वर्षातील आय. टी., तसेच कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कंपनीच्या वतीने कंपनीचे सहसंस्थापक मा. विराज खटावकर यांनी Video Conferencing च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण हे १९ आठवडे दिले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यू मधून विद्यार्थ्यांची निवड Junior Software Associate म्हणून केली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून भविष्यकालीन नोकरीची तरतूद असल्यामुळे पालक वर्गातून व समाजातून सदर प्रशिक्षणाबाबत व देवगड महाविद्यालयाच्या कौतुकास्पद कार्याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Blogs

Leave us a Comment