देवगड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन

yoga

देवगड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग उपक्रमाचे आयोजन

देवगड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमांतर्गत देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती केळकर यांनी उपस्थितांसमोर योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. डॉ. श्रुती केळकर यांनी उपस्थितांना मानवी जीवनातील योगाचे महत्व समजावून सांगताना प्राणायामचे विविध प्रकार सादर केले व उपस्थित सर्वांकडून प्राणायाम प्रात्याक्षिके करवून घेतली.

सदर योग दिनाचे आयोजन हे देवगड महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एन. एस. एस. विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Related Blogs

Leave us a Comment