देवगड महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

देवगड महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस हा ग्रंथपाल दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. देवगड महाविद्यालयानेही प्रस्तुत वर्षी सदर उपक्रम उत्साहात संपन्न केला.
देवगड महाविद्यालयाच्या या उपक्रमांतर्गत सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल डॉ. एस. ए. एन. इनामदार यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात वाचनाची सवय कशी विकसित करावी याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
डॉ. इनामदार यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देतानाच वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो याबाबतची माहितीही दिली. शिवाय संदर्भ ग्रंथ वापरण्याचे फायदे काय असतात हे समजावून सांगून अलीकडील कालावधीत फारच प्रसिद्धीस आलेल्या इलेक्ट्रोनिक्स रिसोर्सेस बद्दलही सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.