मासिक पाळी व्यवस्थापन – डॉ. श्रुती केळकर यांनी केले मार्गदर्शन

menestrual hygine management devgad college

देवगड महाविद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन या विषयासंदर्भात  संवाद सत्राचे आयोजन

डॉ. श्रुती केळकर यांनी केले मार्गदर्शन

देवगड महाविद्यालयात ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयासंदर्भात संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. श्रुती केळकर यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे देवगड कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी स्त्रियांचे प्रजनन, मासिक पाळीचे चक्र, मासिक पाळी का येते किंवा त्या संदर्भातील समस्या काय असू शकतात, तसेच मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती विद्यार्थिनींना करून दिली. तसेच सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची व त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची पद्धती याविषयाचीही माहिती देऊन स्त्रियांसाठीचा पोषक आहार व व्यायाम याबाबतचे मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुखदा जांबळे यांनी देवगड महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सोयीसाठी बसविण्यात आलेल्या ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशिन’ विषयीची माहिती विद्यार्थिनींना देऊन सदर मशिन वापरण्याच्या पद्धतीविषयीचे मार्गदर्शन चित्रफितीच्या सहाय्याने केले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणार्‍या ‘उत्कर्षा’ या किशोरवयीन मुलींसाठीच्या उपक्रमांतर्गत देवगड कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Blogs

Leave us a Comment