देवगड महाविद्यालयात संशोधन विषयावरील व्याख्यानमाला संपन्न

- Posted by admin
- Posted in Institutional Welfare
देवगड महाविद्यालयात संशोधन विषयावरील व्याख्यानमाला संपन्न..
अलीकडील काळात शासन, यु. जी. सी. व विद्यापीठांच्या बदललेल्या ध्येयधोरणानुसार संशोधनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच धोरणाला अनुषंगून देवगड महाविद्यालयाने संशोधन प्रक्रियेला चालना देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून विशेष प्रयत्न सुरु केलेले आहेत. त्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण महाविद्यालयाने आखलेले आहे.
याच धोरणाचा एक भाग म्हणजे देवगड महाविद्यालयात संशोधन विषयावरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानमाले अंतर्गत सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल डॉ. एस. ए. एन. इनामदार व पुणे येथील आगरकर संशोधन इन्स्टिट्यूटच्या इ-१ गट वैज्ञानिक डॉ. विनया घाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. इनामदार व डॉ. घाटे यांनी ‘संशोधन कौशल्य विकास’ या विषयाशी संबंधित घटकांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
डॉ. इनामदार यांनी संशोधनाची गरज व संशोधनाचा इतिहास सविस्तर नमूद करून चांगला संशोधन लेख शास्त्रीय दृष्ट्या कसा लिहावा याबाबत सखोल विवेचन केले. तर डॉ. घाटे यांनी त्यांनी स्वत: केलेल्या जैवविविधतेच्या संशोधनाची अनुभवपर माहिती देऊन माहितीचे संकलन कसे करावे याविषयीची विशेष माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन करणे कसे गरजेचे आहे याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.