क्रीडा स्पर्धा सप्ताह

देवगड महाविद्यालयाचा क्रीडा स्पर्धा सप्ताह सुरू, सुमारे १५०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ५०० विद्यार्थ्यांनी

घेतला विविध खेळांमध्ये सहभाग

देवगड महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा सप्ता आजच सुरू झाला. आणि पहिल्याच दिवशी महाविद्यालयाच्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आणि यासाठी क्रीडांगणावर जवळपास १५०० विद्यार्थी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना, मित्र – मैत्रिणींना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

आजच देवगड महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी शितल पाटकर हरियाणा राज्यात सुरू असलेल्या रस्सीखेच स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आहे आणि आजच देवगड महाविद्यालयामध्ये सुरू झालेल्या या क्रीडा स्पर्धा सप्ताहामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हा अभूतपूर्व उत्साह पाहून सर्वच अचंबित झाले. देवगड महाविद्यालयात सुरू झालेला हा क्रीडा स्पर्धा सप्ताह एक आठवडा चालेल आणि यापुढील दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग याहीपेक्षा वाढेल हे निश्चित.

अर्थात या उत्स्फूर्त आणि प्रचंड सहभागापाठीमागे २०१६ – २०१७ या शैक्षणिक वर्षापासून देवगड महाविद्यालयाच्या तज्ञ समितीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली नवीन स्पोर्ट्स पॉलिसी आहे. सदर स्पोर्ट्स पॉलिसी अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळांमध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालयाकडून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. प्रस्तुत वर्षी महाविद्यालयाच्या वतीने फूटबॉलसारखा खेळही सुरू करून त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळांमध्ये सहभागी होता यावे व खेळामध्ये आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना खेळासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा त्यामागील महत्वपूर्ण उद्देश आहे. यासाठी देवगड महाविद्यालय खेळांसाठी चांगले वातावरण व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Related Blogs

Leave us a Comment