कादंबरी यादव हिची टेबल टेनिस राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड

1

देवगड महाविद्यालयाच्या नवीन क्रीडा धोरणाची यशस्विता

कादंबरी यादव हिची टेबल टेनिस राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड

देवगड महाविद्यालयाने या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स पॉलिसी तयार केली असून त्याअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळांमध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खेळांमध्ये सहभागी होता यावे व खेळामध्ये आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना खेळासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा त्यामागील महत्वपूर्ण उद्देश आहे. त्यासाठी फूटबॉलसारखा खेळही यावर्षी सुरू करून त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. त्याचप्रमाणे अन्य खेळांसाठीही चांगले वातावरण व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे.

देवगड महाविद्यालयाच्या याच प्रयत्नांची परिणीती म्हणजे नुकत्याच दि. २१ व २२ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत कादंबरी यादव या देवगड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. कादंबरी यादव ही देवगड महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिची १९ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात निवड झालेली आहे. सदर राज्यस्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धा ही नाशिक येथे संपन्न होणार असून तिच्या या निवडीबद्दल सगळीकडून तिचे विशेष अभिनंदन होत आहे.

Related Blogs

Leave us a Comment