मुंबई विद्यापीठाकडून देवगड महाविद्यालयाची व्हर्चुअल क्लासरूम साठी निवड

virtual-classroom in devgad

मुंबई विद्यापीठाकडून देवगड महाविद्यालयाची व्हर्चुअल क्लासरूम साठी निवड

मुंबई विद्यापीठाकडून देवगड महाविद्यालयाची व्हर्चुअल क्लासरूम साठी निवड करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणार्‍या विशेषत: ग्रामीण भागात कार्यरत असणार्‍या महाविद्यालयांना विद्यापीठाच्या विकास प्रवाहात सामावून घेण्यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्या अंतर्गत मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणार्‍या ७५० महाविद्यालयांपैकी निवडक ४० महाविद्यालयांची निवड सदर प्रकल्पासाठी केलेली आहे. त्यामध्ये देवगड महाविद्यालयाची समाविष्टता करण्यात आलेली आहे.

सदर व्हर्चुअल क्लासरूमच्या सहाय्याने सदर सर्व महाविद्यालये थेट मुंबई विद्यापीठाशी जोडली जाणार असून त्याद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद यांची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे. सदर क्लासरूमच्या सहाय्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

सदर प्रकल्पासाठी देवगड महाविद्यालयाची निवड ही देवगड महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची व अभिमानास्पद बाब असून याद्वारे देवगड महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.सदर क्लासरूमचा फायदा देवगड महाविद्यालयात शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी, तसेच समाजासाठी अधिकाधिक कसा करून घेता येईल यासाठी यापुढील काळात आमच्या वतीने प्रयत्न केले जातील. तसेच मुंबई विद्यापीठाच्या अशा प्रभावी व सकारात्मक योजनांमध्ये सामील होण्यासाठी यापुढेही आमच्या वतीने असेच सकारात्मक प्रयत्न केले जातील.

Related Blogs

Leave us a Comment